Navratri 2024: नवरात्रीमध्ये कसा लूक करायचा असा प्रश्न पडतोय? नवरात्रीत सुंदर लूक मिळवण्यासाठी "या" गोष्टींची जोड द्या...
नवरात्री काही दिवसांवर आली आहे आणि नवरात्रीत 9 दिवस दुर्गा माताचे घट विराजमान होईल. या नऊ दिवसात वातावरणात सर्वत्र उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो तर गरबा, दांडिया यांसारखे खेळ देखील पाहायला मिळतात. तसेच नवरात्री या सणामध्ये तरुणाईमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. नवरात्रीत मुलींना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस कशा प्रकारे तयार व्हायचं हाच प्रश्न पडतो. नवरात्रीमध्ये कसा लूक करायचा असा प्रश्न पडत असेल तर पुढील टीप्स तुमच्यासाठी, पुढील नक्की फॉलो करा...
नवरात्रीत कोणत्या प्रकारचा लेहेंगा परिधान कराल:
नवरात्री म्हटली की सर्वात पहिला डोळ्यासमोर येतो तो बांधणी डिझाईनचा लेहेंगा, नवरात्रीत सर्वात मोठ्या प्रमाणात बांधणीचा लेहेंगा परिधान केला जातो. जर तुम्ही बांधणीचा लेहेंगा परिधान करताय तर मग तुम्ही त्याच्यावर ऑक्सिडाइज्ड म्हणजेच चांदीचे दागिने निवडू शकता. ज्यामुळे तुमचा लूक नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी अगदी योग्य ठरेल आणि तुम्ही फार सुंदर देखील दिसाल.
तसेच तुम्ही आता ट्रेंडिंगला असणारा वर्क केलेले लेहेंगा देखील परिधान करू शकता. वर्क केलेल्या लेहेंग्यावर फुलांच्या आणि इतर प्रकारच्या डिझाईन पाहायला मिळतात. तसेच हा लेहेंगा वजनाने हलका असतो ज्यामुळे तुम्हाला दांडिया खेळणे सहज आणि सोपे जाईल. यावर तुम्ही एमराल्ड ज्वेलरी वापरू शकता. याने तुमचा लूक इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर दिसेल.
तसेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही एम्ब्रॉयडरी लेहेंगा देखील परिधान करू शकता. हा लेहेंगा मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यात किंवा इतर कौटुंबीक कार्यक्रमात परिधान केला जातो. पण तुम्ही नवरात्रीमध्ये हा लेहेंगा परिधान करून एक वेगळाच लूक तयार कराल. यावर तूम्ही डायमंड मध्ये ज्वेलरी निवडू शकता ज्यामुळे तुमचा एक स्टइलिश लूक तयार होईल.
मेकअप आणि केशरचना कशी कराल:
यासर्व लूकवर हलका मेकअप तुम्हाला आकर्षक लूक देईल. न्यूड आणि हलक्या रंगाची लिपस्टिक तुम्हाला एक गोड लूक देईल. तसेच केशरचनेसाठी तुम्हा केस मोकळे सोडू शकता किंवा सुंदर वेणी आणि पोनीटेल देखील बांधू शकता. यामध्ये आकर्षणासाठी सुंदर फुलांचा देखील वापर करू शकता. अशा मेकअप लूकमध्ये तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसाल.